कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
For Vidhi,
Email:- info@vpandit.com
Contact Number:- 1800-890-1431
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी
झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
रवींदु दावानल पूर्ण भाळी ।
स्वतेज नेत्रीं तिमिरौघ
जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
जटा विभूति उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी ||
उदार मेरु पति शैलजेचा ।
श्रीविश्र्वनाथ म्हणती
सुरांचा ।
दयानिधीचा गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष महा
विदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
कर्पूरगौरी गिरिजा विराजे ।
हळाहळें कंठ निळाचि साजे
।
दारिद्र्यदुःखे स्मरणें
निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
स्मशानक्रीडा करितां सुखावे ।
तो देव चूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामी माझा ध्वज
शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्रीविश्वनाथ म्हणती
सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करि काम भग्न
।
तो रुद्र विश्वंभर दक्ष
मारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
इच्छा हराची जग हे विशाळ ।
पाळी रची तो करि
ब्रह्मगोळ ।
उमापति भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारक
ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर
त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या ।
पादारविंदी वाहाती
हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
कीर्ती हराची स्तुति बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता
।
अंकी उमा ते गिरिरुपधारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
सदा तपस्वी असे कामधेनू ।
सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
कर्पूरगौर स्मरल्या विसांवा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा
।
अंती स्वहीत सुवना विचारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
विरामकाळीं विकळ शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर
।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
सुखावसाने सकळ सुखाची ।
दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसाने धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
अनुहात शब्द गगनी न माय ।
त्याने निनादें भव शून्य
होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
शांति स्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळी असुनी न
दिसे ।
भिल्ली भवानी शिव
ब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
पीतांबरे मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणीची
।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंची तुटली
उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद
चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
निधानकुंभ भरला अभंग ।
पाहा निजांगें शिव
ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी
।
काशीपुरी भैरव विश्व तारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळां मालतिमाळ हातीं
।
प्रताप सूर्यशरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकसे
।
नेई सुपंथे भवपैलतीरीं ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
नागेशनामा सकळा जिव्हाळा ।
मना जपें रे शिवमंत्रमाळा
।
पंचाक्षरी घ्यान
गुहाविहारीं ।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
एकांति ये रे गुरुराज स्वामीं ।
चैतन्यरुपीं शिवसौख्य
नामीं ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी
।
तुजवीण शंभो मज कोण तारी
॥
योगाभ्यास नको व्रतें मख
नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं
नको दुष्टांस शंकूं नको ।
Write a public review